Ticker

6/recent/ticker-posts

महानगरात रोटरी नॉर्थची वृक्षारोपण मोहिम

महानगरात रोटरी नॉर्थची वृक्षारोपण मोहिम 


 
अकोला- सामाजिक व मानवसेवी कार्यात सदा कार्यरत रोटरी क्लब आफ अकोला नॉर्थच्या वतीने महानगरात वृक्षारोपण मोहिम प्रारंभ करण्यात आली.
 करोना संकटात प्राणवायुची निकड भासत आहे. वृक्षतोड होत असल्यामळें ऑक्सीजन व पर्यावरण वर घोर संकट निर्माण झाले आहे.सुंदर व हरित अकोला करण्यासाठीं रोटरी नार्थ ने हा रचनात्मक उपक्रम साकार केला.वृक्षमित्र डॉ.श्रीधर देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा रोटरी नार्थचे अध्यक्ष देवेंद्र वाकचौरे यांच्या अध्यक्षतेत स्थानीय होमगार्ड कार्यालय  परिसरात ही मोहिम प्रारंभ करण्यात आली.



तर द्वितीय सत्रात स्थानीय कौलखेड परिसरातील समता कॉलनी येथील बुद्धविहार परिसरात डॉ.जुगल चिरणीया तथा समता बहुउद्देशीय विकास मंडळाचे अध्यक्ष अण्णा वानखेडे,मधुकरराव कौसल, प्रकल्प प्रमुख डॉ.गजानन
 वाघोडे,मुरलीधर कौसल,नितिन डोंगरे,राजू उखळकर,अरुणराव देशमुख, प्रबोध देशपांडे किरण चौक, पळसपगार,डॉ. धारस्कर, दामोदरे आदी मान्यवर उपस्थित होते.होमगार्ड कार्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते 12  झाडे लावण्यात आलीत. यावेळी झाडांना ट्री गार्ड पण उपलब्ध करण्यात आले. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धनची जबाबदारी रोटरी क्लब आफ अकोला नार्थच्या वतीने घेण्यात आली.हे ट्री गार्ड मिलिंद देव,विनोद देव,कुलकर्णी,राजू बुरुकुले आदीनी प्रदान केलेत.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही म्हण वृक्षारोपण मोहिमेद्वारे करून नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचे आवाहन डॉ.श्रीधर देशपांडे यांनी करून या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्यात.समता कॉलनी येथील मोहिमेत नूतन अध्यक्ष वाघचौरे यांचा सत्कार करण्यात आला.येथील कार्यक्रमाचे संचालन अनिल सोनोने यांनी तर आभार प्रकाश टोपरे यांनी मानले.यावेळी मारोती खंडारे,काशिराम शिरसाट,मेजर भास्कर खडसे,निरंजन वाहुरवाघ,अनंत वानखेडे,राजेश तायडे,रवींद्र कांबळे,डॉ.विठ्ठल खडसे, ओंकारराव
 कांबळे,संतोष मनवर, सुनील सोनोने समवेत रोटरी नॉर्थचे बहूसंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



अकोला डेली मेल 
मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या