Ticker

6/recent/ticker-posts

आर्थीक तनावातून वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल

आर्थीक तनावातून वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल


पातूर तालुक्यात प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे
अकोला जिल्हा पातूर तालुका मधील पोलिस स्टेशन चांनी अंतर्गत येत असलेले ग्राम गावंडगाव येथिल नागरिक किसन सकरू जाधव वय 65 वर्ष हे दिनांक 3 फेब्रुवारी 2025 बेपत्ता झाले अशी मिसिंग तक्रार पोलिस स्टेशन चांनी येथे दाखल केली होती. 3 एप्रिल 2025 रोजी एक इसम इंधन काळी जळतान साठी दाट जंगलात सकाळी गेला असता. किसन सकरू जाधव यांचे प्रेत एका पाटसिंगी घनदाट जंगलात झाडाला फाशी घेऊन लटकलेले दिसले. याची खबर पोलिस स्टेशन चांनी येथे दिली असता तात्काळ ठाणेदार रवींद्र लांडे व बीट जमादार सुधाकर करवते व पोलिस पथक घटना स्थळी दाखल होऊन मृतदेहचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोउपचार रुग्णालय अकोला येथे पाठवन्यात आला. सुत्रांकडून मिळालेल्या प्राथमीक माहिती नुसार आर्थीक तनावातून किसन सकरू जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास चानी पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांचे मार्गदर्शन खाली होत आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या