अखेर आजपासून कामगार लाभसाठी आवश्यक लिंक झाली खुली
कामगारांच्या आंदोलन आणि निवेदनामुळेच शासनाचा निर्णय पत्रकार परिषदेत केला दावा
अकोला
६ नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि राज्यातील विविध कामगार संघटनाचे निवेदने, आंदोलन यांचे वाढता दबाव यामुळे महाराष्ट्र शासनाचे कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी एकत्र बसून राज्यातील ३५८ सुविधा केंद्रावर कामगारांना होत असलेल्या त्रासामुळे आलेल्या तक्रारिंची दखल घेऊन आज ६ फेब्रुवारी २०२५ पासून राज्यातील कामगारांना सर्व लाभ घेता यावेत.यासाठी कामगार कल्याण मंडळाची पोर्टल लिंक खुली केली जात आहे. यासाठीचे श्रेय हे बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघांचे आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे असल्याचा दावा आज अकोल्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सचिव प्रशांत मेश्राम यांनी दावा केला आहे.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन लिंक द्वारे कामगार लाभाचे अर्ज भरणे, त्रुटी दूर करणे अशी सर्व कामे कामगारांना स्वतः च्या मोबाईल, सेवा केंद्रानमार्फत केली जात होती मात्र काही महिन्यांपूर्वी शासनाने राज्यात तालुका स्तरावर कंपनीच्या करारनुसार सुविधा केंद्र सुरु करून सेवा केंद्र आणि कामगारांच्या मोबाईल वर लिंक देणे बंद केले होते त्यामुळे कामगारांना मोठ्या अडचणीत लाभाचे अर्ज करावे लागत होते. त्यामुळे ही पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन सुरु करण्यासाठी कामगार संघटनानी विविध स्तरावर मोर्चे, आंदोलन आणि निवेदने दिली होती. सोबतच विद्य. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निकाल कामगार संघटनाच्या बाजूला लागला होता.यामुळे शासनावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून अखेर आज ६ फेब्रुवारी पासून पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल सर्वांसाठी खुली केली जाणार असून हे यश कामगार संघटनाचे असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सचिव प्रशांत मेश्राम यांनीआज अकोल्यात पत्रकार परिषदेत केला आहे. 2 जानेवारी 2025 रोजी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे कामगार मंत्री आमदार आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले. सर्व ऑनलाईन पोर्टल सर्वांना खुले करण्यात येईल करण्यात येईल असे चर्चामध्ये आश्वासन दिले होते. तसेच वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून कामगार मंत्री सचिव यांची कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदन दिले राज्यातील 54 लाख बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सर्व कल्याणकारी योजना या महिन्यापासून वंचित असताना त्यासाठी वारंवार चर्चा करून पूर्व सुरू करण्याची मागणी केली होती.त्यावर उशिरा मंडळाने आदेश काढले की,बांधकाम कामगारांना पूर्वीप्रमाणे फक्त सुविधा केंद्र नाही तर जवळच्या ऑनलाईन सेंटरवर किंवा बांधकाम कामगार स्वतः मोबाईलद्वारे नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज भरू शकतो व त्यांना नियमित तारीख देऊन बी ओ सी डब्ल्यू कार्यालय तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन आपापल्या कागदपत्राची पडताळणी करून त्यानंतर नोंद करण्यात येईल असे आदेश सर्व महाराष्ट्रभर तालुका केंद्रीय कामगार आयुक्त कामगार अधिकारी यांच्या कार्यालयास पाठवले. हे यश महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समितीचे अध्यक्ष सागर तायडे, कार्याध्यक्ष राजकुमार होळीकर, उपाध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, कोषाध्यक्ष अजय कांबळे, महासचिव विनिता बाळकुंद्रे,सचिव प्रशांत मेश्राम रत्नपाल डोपे या समितीच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी पाठपुरा करून हे यश पदरात पाडून घेतले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.आज झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती सचिव प्रशांत मेश्राम,८ बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ उपाध्यक्ष अब्दुल बशीर, विनोद जपसरे, सुरेश कारंडे, प्रसिद्धी प्रमुख गणेश सावळे, प्रियंका सिरसाट, विशाल सावळे,सुरेश अवचार, गोपाल पुंडकर, नागेश नेमाडे, ऋषिकेश शेटे, मंगेश कुचर आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या