शिवानंद दादाजी धुनीवाले यांची जयंती उत्साहात साजरी
मुर्तीजापुर प्रतिनिधी- नागोराव तायडे
हिरपूर येथील प्रसिद्ध असलेले दादाजी धुनिवाले खंडवा यांचे शिष्य श्री शिवानंद दादाजी धुनिवाले यांचा 144 वा जयंती महोत्सव दि.02/02/2025 ला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हिरपूर येथील मुर्तीजापुर तालुक्यात प्रसिद्ध असलेले खंडवा येथील प्रसिद्ध असलेले संत मालिकेतील बालब्रह्मचारी श्री. शिवानंद दादाजी धुनिवाले यांचा 144 वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस ह. भ. प. गजानन महाराज वायकर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर दादाजी चा जन्मोत्सव सुद्धा भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
कार्यक्रमानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शामरावजी डहाके ,बबनराव डाबेराव, दिलीपराव देशमुख , सुयोग वह्रेकर, अशोकराव राऊत, नामदेव डांगे, गणपतराव गुल्हाने,संजय डांगे, कैलास पालीवाल ,देवानंद लबडे, राजू घाटोळ, अरुण माकोडे, राजू चौधरी ,अविनाश मेहरे, अजय राठोड, यश अहिर, योगेश तायडे, गजानन चौधरी पंजाब धांडे. यांनी परिश्रम घेतले. यावेळेस हिरपूर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या