मूकबधिर विद्यालय मूर्तिजापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी -नागोराव तायडे
मूर्तिजापूर
आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी शिक्षणाची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती श्री संत गुणवंत महाराज निवासी मतिमंद विद्यालय व स्वर्गीय मधुकरराव सरदार निवासी मूकबधिर विद्यालय मूर्तिजापूर येथे साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे लिलाबाई खांडेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ, मुलमुले मॅडम तसेच डॉ, स्वाती बायस्कर मॅडम डॉ, सूर्यवंशी साहेब तसेच श्रीमती सविताताई वाघ व दामिनी पथकाच्या प्रमुख सोळंके मॅडम यशोधरा महिला संघाचे अध्यक्ष व सचिव व त्यांच्या संघ उपस्थित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.बाळासाहेब खांडेकर तसेच संस्थेचे सचिव सौ .उमाताई खांडेकर सहसचिव श्रीमती छाया ताई खांडेकर संस्थेचे सदस्य रिंकू ताई खांडेकर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी सर्व पाहुण्यांचे व महिला कर्मचाऱ्यांचे कर्तबगार महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यावेळेस उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते
0 टिप्पण्या