ब्रह्माकुमारी द्वारे ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न उपमुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदाराची उपस्थिती
प्रतिनिधी संतोष माने
मूर्तिजापूर
मूर्तिजापूर
ब्रह्माकुमारी शाखा हिरपूर व हिरपूर सांजापूर ग्रामस्थांच्या वतीने अमृत महोत्सवी शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. समाजामध्ये ज्येष्ठ लोकांबद्दल आदरभाव व ऋणानुबंध कमी होत चाललेला आहे. त्यांचे अनुभव व विचार ऐकण्यास आजच्या पिढीला वेळ व रस नाही. त्यामुळे 75 वर्षाच्या वरील सर्व ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार सोहळा ब्रह्माकुमारीपूर व हिरपूर सांजापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात करता मुख्य अतिथी म्हणून अमरावती जिल्हा संचालिका राजयोगीनी सितादीदी, जयश्री कोलखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अकोला, मायाताई संजय नाईक शिक्षण सभापती जि. प. अकोला, प्रा.श्रीकांत तिडके ज्येष्ठ साहित्यक,अँड .रमेश फडनाईक, बबनरावजी डाबेराव, आनंदराव गणोरकर, . तसेच ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर ,जोशी सर, गजानन चौधरी, प्रा. सुधाकर गौरखेडे. रूपालीताई तिडके, आदर्श सरपंच अंजलीताई ठाकरे, विलास भाऊ नसले, यांचे प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व मान्यवरांच्या हस्ते सुधाकर आगाशे ,साहेबराव गावंडे, रामकृष्ण आसरे, मुरलीधर ठाकूर, किसनराव मानकर , गोवर्धन मेहरे, वाडेकर गुरुजी, उत्तमराव राऊत, महादेवराव भालेराव, शशिकला घाटोळ, राजकांता घाटोळ, सुमित्रा अढावू , कमल अढावूकर, रामभाऊ अढावूकर, इंदुमती घडेकर, अरुण कंझरकर, दत्तात्रय गीते, इंदुमती अर्जुन ननीर, वछलाबाई डाबेराव, लक्ष्मीबाई नारायण बुटे, गिताबाई शांतिनाथ तिहीले, या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सर्व भाव विभोर झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोदभाई, सोपानभाई, गोपालभाई, गजाननभाई, देवानंद भाई, बनारसेभाई ,गोपालभाई, संदीप मेहरे, विनोद पांडे, सुयोग वरेकर, अथर्व राजगुरे, देवानंद सोनुले , दिलीप तिहिले, धनंजय कांडेलकर ,शुभदा कुलकर्णी, स्वाती राजगुरे, सविता भालेराव, सीता गुल्हाने, छाया गावंडे वंदना टिके,कमला गुल्हाने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मुक्त दीदी तर आभार प्रदर्शन अँड .डी. एल. देशमुख यांनी केले.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या