अकोला पश्चिमचा पराभव दुखद बंडखोरी करणारावर होणार कारवाई - आमदार सावरकर
अकोला
विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर उमेद्वारांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले, हा पराभव दुखद असला तरी यातून पुढे जात विकास कामाला प्राधान्य देण्यात येईल. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात हात मिळवणी कधीच करणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी प्रकार परिषदेमध्ये केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, जयंत मसने आदींची उपस्थिती होती. अनेकांनी भाजप सोबत बंडखोरी व विरोधात काम करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याना पक्षात काही स्थान उरणार नाही, त्यांच्यासोबत हात मिळवींनी करणार नाही असेही ते पुढे बोलताना म्हणाले. भाजपाच्या विरोधात काम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात ही कारवाई सर्वांसमोर उघड केली जाईल असेही आ.रणधीर सावरकर मी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.
0 टिप्पण्या