" रणधीर भाऊ " खरच आम्हा बहिणींना खूप मोठा आधार दिला तुम्ही भावांनी
लाडकी बहीण योजनेचे महत्व फक्त आम्हाला माहित, वेताळ बाबा संस्थान येथे आयोजित "लाडक्या बहिनींच्या" सवांद मेळाव्यात महिलांनी व्यक्त केल्या भावना
" लाडली बहीण " हे फक्त शब्दांमध्ये व्यक्त होणारी योजना नाही. तर हे भाऊ - बहिणीच्या नात्याप्रति असलेली जबाबदारी निभावण्याची अनुभूती देणारी योजना आहे. मनूनच " रणधीर" भाऊ तुम्हा भावांनी आम्हाला दिलेल्या आधाराबद्दल आम्ही सर्व बहिणी खूप खूप आभारी आहोत.
देवरी फाटा वेताळ बाबा संस्थानच्या प्रांगनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने लाडक्या बहिन्यांच्या सवांद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर , सुहासिनीताई धोत्रे, वैशालीताई निकम, चंदाताई शर्मा, अर्चनाताई मसने, मंजु्षाताई सावरकर, समीक्षाताई धोत्रे, आदी उपस्थित होत्या. या मेळाव्यात कर्तृत्ववान मातृशक्तीचा सन्मान ही करण्यात आला. महिन्याला 1500 रुपयांचा आधार मिळणं हे कितपत मोठी बाब आहे हे. त्या महिलांना विचारावं लागेल ज्यांची एका महिन्याच्या औषधीची व्यवस्था या योजनेमुळे तात्काळ होऊ लागली आहे. घरातल्या दैनंदिन गरजा लगेच पूर्ण होऊ लागल्यात. 1500 रुपयात काय होत नाही. एका महिन्याचा आठवडी बाजार याच 1500 रुपयात करून आपल्या कुटुंबाच्या गरजा भगवणाऱ्याही महिला आहेत. याच पैशातून आपल्या कुटुंब प्रमुखाला आर्थिक मदत करणाऱ्याही महिला आहेत.आज महिला वर्ग या " लाडली बहीण " योजनेच्या 1500 रुपयांमध्ये आपल्या सर्व आवश्यक गरजा पूर्ण करू लागल्या आहेत.
गरज पडली की कुणी 100 रुपयांची मदत करायला तयार होत नाही. मग या 1500 रुपयांचे महत्व शब्दात व्यक्त केल्या जाऊ शकत नाही. खरच "रणधीर भाऊ" आभार मानावे तेव्हढे कमीच आहे. आणि तुम्ही व तुमच्या सरकारने आमचा भाऊ मनून आमची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ही योजना राबवली याकरिता आम्ही सर्व आपल्याप्रति कृतन्यता व्यक्त करतो. आम्हा सर्व बहिणीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील अशा भावनिक शब्दात असंख्य बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या