Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी केंद्राच्या वतीने पोषण महिना साजरा

अंगणवाडी केंद्राच्या वतीने पोषण महिना साजरा


 तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पोषण सुधारणा योजने अंतर्गत हिरपूरअंगणवाडी केंद्राने दि.23/09/24 ला प्रकल्प अधिकारी मायावती खरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवून पोषण महिना साजरा करण्यात आला 
याप्रसंगी पर्यवेक्षिका येरखडे मॅडम यांनी अभियानाबद्दल माहिती दिली. 
कुषोषणमुक्तीचे स्वप्न पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.गरोदर महिलांची काळजी, प्रसूतीनंतर तात्काळ आणि सहा महिन्या पर्यंत स्तनपान, सहा महिन्यानंतर बालकांना वरचा आहार सुरू करणे,बालकांचे वृद्धी संनियंत्रण, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता, मुलीचे शिक्षण, पोषण आहार व विवाहाचे योग्य वय,आरोग्यदायी आणि सूक्ष्म पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवण आदी संकल्पनेवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम व उपक्रम राबवून पोषणाची लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्याप्रकारे करण्यात आला. प्रभातफेरी, बालपंगत, विशेष ग्रामसभा,पोषण विषयावर शाळेत चित्रफित, योग्य आहाराचे सेवन मार्गदर्शन,बचत गटाच्या बैठका, अंगणवाडीत वजन महोत्सव, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण दिवस, गणेशोत्सव काळात योजनेची प्रसिद्धी, योगा आयोजन, हात धूणे उपक्रम,चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजन, परसबाग निर्माण, आरोग्य तपासणी, आदी उपक्रम नेटाने राबविण्यात आले.अखेर अहवाल संकलन करून २३ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात अभियानाची माहिती देण्यात आली. सुदृढ बालक स्पर्धे अंतर्गत बक्षिसांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पतंजली महिला जिल्हाध्यक्ष डॉ. स्वाती पोटे पत्रकार प्रविण ढगे, मुख्याध्यापक आंबेडकर मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून हिरपूर सरपंच अमोल गडवे, सांजापूर उपसरपंच किशोर डांगे, नितीन वस्तू, आरोग्य सेविका सोनकुसरे मॅडम, पोतदार मॅडम ,सुशीला शिंदे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका शिल्पा वह्रेकर ,रजनी सराफ, उषा हेमने,प्रतिभा वह्रेकर ,रजनी राजगुरे, श्रद्धा तायडे , गीताबाई दहीकर, अंजली हेमने, वंदनाताई सळेदार ,ऊषा शिराळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुयोग वह्रेकर तर आभार प्रदर्शन अंबाडकर मॅडम यांनी केले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या