Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ, खा. अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल

राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ, खा. अनुप धोत्रे यांच्या मागणीची दखल 


अकोला
 लोकसभा मतदारसंघातील विविध समस्यांना घेऊन लोकसभेचे युवा खासदार अनुप धोत्रे यांची केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत दिल्ली येथे अकोला लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा दृष्टीने निवेदन दिल्यावर ताबडतोब नामदार गडकरी यांनी बैठक अधिकाऱ्यांना निर्देश देऊन प्रस्ताव सादरीकरणाचे आदेश देऊन पश्चिम विदर्भाच्या विकासाला चालना देण्यासाठी व अकोले करांच्या समस्या निराकरणासाठी व न्याय देण्यासाठी आपण सदैव खासदार धोत्रे यांच्या मागणीची दखल घेऊन पूर्तता करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊ असे अभिवचन दिले.


या बैठकीत अकोला ते खंडवा दरम्यान एक राष्ट्रीय महामार्ग देण्यात यावा अशी मागणी अनुप धोत्रे यांनी केली. जेणेकरून अकोला हे शहर मध्यवर्ती संपर्काचे केंद्र बिंदू म्हणून काम करत असल्याने मध्यप्रदेश ते तेलंगणा या दरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ कमी होऊन योग्य दळणवळणाची सोय होईल. तसेच अकोला जिल्ह्यातील निपाणा येथे महामार्ग क्रमांक 53 वर अंडरपास बांधणे, अकोला - वाशीम विभागासह अकोला बायपासचा विकास करणे, अकोट अकोला रोडवरील रेल्वे पूल जुने झाले असून त्यासाठी अकोला रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज (ROB) बांधणे अकोट अकोला दळणवळणाच्या सुविधेला गती देण्याची मागणी खासदार धोत्रे यांनी केली. 
तसेच मेट्रो ट्रेन अमरावती पर्यंत येत असून संत गजानन महाराज शेगाव पर्यंत ही मेट्रो ट्रेन नागपूर पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केली यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल,महायुतीचे नेते तुकाराम बिडकर यांनी सुद्धा मागणी केली होती त्या मागणीची पूर्तता करावी अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी नामदार गडकरी यांच्याकडे केली आहे.


शिवणी येथील अप्पू पुतळा येथे राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी अंडरपास बांधणे आवश्यक असल्याची मागणी अनुप धोत्रे यांनी केली. या मागणीची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सर्व मागण्या तात्काळ पुर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले. या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, अकोला जिल्ह्यातील महामार्ग विकासात येणाऱ्या अडचणी दूर होऊन कनेक्टिव्हिटी वाढेल व आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि अकोला लोकसभा मतदार संघातील स्थानिक लोकांचा यामुळे फायदा होईल. तसेच वाहन भुयारी मार्ग, पूल यामुळे सुरक्षितता निर्माण होऊन वाहतूक सुरळीत होईल व अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे. यावेळी सेक्रेटरी तसेच अप्पर सचिव व बांधकाम विभागातील सुविधा उपलब्ध करून देणारे तज्ञ अधिकारी यांना पाचारण करून या संदर्भात नामदार गडकरी यांनी तात्काळ दखल घेतली याबद्दल अकोले यांच्यावतीने खासदार अनुप धोत्रे यांनी नामदार नितीन गडकरी विकास पुरुष यांचे आभार अभिनंदन केले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या