Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन माना हदिदत जप्त केलल्या 141 किलो ग्रॅम गांजा मधील आरोपीस ओडीशा येथून अटक

पोलीस स्टेशन माना हदिदत जप्त केलल्या 141 किलो ग्रॅम गांजा मधील आरोपीस ओडीशा येथून अटक

 मूर्तिजापूर 
 प्रतिनिधी- संतोष माने 
दिनांक 19/02/2024 रोजी पोस्टे माना येथे दाखल अप.क. 116/2024 कलम 8 क, 20 क, 29 एन डी पी एस अॅक्ट मध्ये 141 किलो ग्रॅम गांजासह एकूण 53,66,600/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. सदर गुन्हयातील ओडीशा येथून गांजा हा अंगलीपदार्थ पाठविणारा आरोपी नामे मो. अब्दुल इम्तियाज गो. अब्दुल हनिफ, वय 40 वर्श, रा, गोसीया मस्जिद, सोनापल्ली, ता. जि. संभलपुर, राज्य ओडीशा यास संभलपूर, ओडीशा येथून अटक करण्यात आली आहे. सदर अटक आरोपीने पिंटु कृष्णा दास, रा कोलकाता याचे मार्फत आरोपी नामे शेख सलमान शेख युनूस, रा.नेर, जि. यवतमाळ याला देणे कामी ट्रकने गांजा पाठविला होता. आरोपी पिंटु कृष्णा दास व शेख सलमान शेख युनूस या दोघांना पोलीसांनी याआधीच अटक केली आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनोहर दाभाडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि सुरज सुरोशे, ठाणेदार पो.स्टे माना, पोउपनि गणेश महाजन, पोकॉ जयकुमार मंडावरे, पोकों आकाश काळे तसेच सायबर पो.स्टे चे अमंलदार पोकों आशिष आगले व पोकों राहुल सानब यांनी तांत्रिक मदत केली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या