मय्यत वृद्ध कलाकारांच्या वारसदारांनी,कलाकार मानधना करीता,जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात संपर्क साधावा
कारंजा (लाड) : सांस्कृतिक विभागाच्या "राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार सन्मान मानधन लाभार्थी योजनेच्या" जुन्या लाभार्थी कलावंतानी तात्काळ समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम येथे जाऊन आपले व आपल्या परिचत सर्व लाभार्थी कलावंताचे हयात प्रमाणपत्र, आधारकार्ड व संपर्का करीता आपला मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे तात्काळ स्वतः जाऊन पोहोचवावीत. अन्यथा त्यांचे पुढील मानधन त्यांना मिळणार नसल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे हा निरोप सर्वांनी लाभार्थी लोककलाकारांपर्यंत पोहोचवावा. (ही बातमी आपण वाचावी व इतर मानधन लाभार्थी कलाकारापर्यत पोहोचवावी.)
यातही महत्वाचे म्हणजे ज्या ज्या लाभार्थी कलाकाराचे निधन म्हणजेच मृत्यु झालेले असतील अशा कलाकाराच्या वारसदारांनी (पती किंवा पत्नी यांनी) मय्यत कलाकाराचा मृत्यु दाखला, वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, पती पत्नीचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर झेरॉक्स प्रतीमध्ये तात्काळ समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांचेकडे देण्यात यावा म्हणजे योजनेचा लाभ मय्यत वृद्ध साहित्यीक कलाकार यांच्या वारसदार यांना सुरु होईल अशी माहिती अध्यक्ष संजय कडोळे,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांना मिळाल्या वरून आपली कागदपत्रे स्वतः समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांना सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलावंत संजय कडोळे यांनी वृद्ध कलावंताना केले आहे.
0 टिप्पण्या