मानधनवाढ व समिती स्थापनेसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेची निर्णांयक लढाई !
जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतीकारी धरणे आंदोलनाचा इशारा
कारंजा (लाड) - वृध्द कलावंतांना मिळणार्या तुटपुंज्या मानधनात भरीव वाढ, गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या कलावंतांच्या प्रस्तावावर निर्णय व वृध्द कलावंत मानधन समितीची स्थापना आणि इतर अनेक मागण्यांसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेने संवैधानिक मार्गाने निर्णायक लढाईचा निर्णय घेतला असून कलावंतांच्या मागण्या त्वरीत पुर्ण करा अन्यथा येत्या २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात नुकतेच विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात तहसिलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, सांस्कृतिक विभागाकडून वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजनेमार्फत दिले जाणारे मानधन हे वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत तुटपुंजे आहे. या मानधनात वृध्द कलावंतांना आपले भरणपोषण आणि आजार उपचार आदींवर औषधोपचार होवू शकत नाही. तसेच गेल्या पाच वर्षापासून जिल्हयात वृध्द कलावंत मानधन समितीची स्थापना झाली नसल्यामुळे मानधनाच्या प्रतिक्षेत शेकडो प्रस्ताव लालफितशाहीत अडकून पडले आहेत. त्यामुळे वृद्ध कलावंतांना सरसकट किमान पाच हजार रुपये मानधन, शासकिय निमशासकिय समित्याची पुनर्रचना, वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थी निवड समितीची स्थापन, समितीवर केवळ कलावंतांचीची निवड, प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी, मृतक कलावंताच्या वारसदारांना वारसाहक्काने मानधन आदी मागण्या सरकारने तात्काळ पुर्ण कराव्या. अन्यथा येत्या २४ जानेवारी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, महाराष्ट्र शासन दलितमित्र पुरस्कार प्राप्त रामबकस डेंडूळे, महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त आणि कर्मयोगी संत गाडगेबाबाची भूमिका साकारणारे - शिवमंगलआप्पा राऊत ; महाराष्ट्र शासन समाजभूषण पुरस्कार प्राप्त आणि महाराष्ट्र शासन पुरस्कृत "जय हो स्वच्छ भारत अभियान" चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भूमिका साकारणारे नटसम्राट कलावंत - प्रकाश गवळीकर ; माजी सरपंच प्रदिप वानखडे,परिवर्तन कला महासंघ वाशिमचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष पूर्णाजी खंदारे, कलावंत राजाराम राऊत, लक्ष्मणराव इंगळे, लक्ष्मण फुके, गजानन वाडेकर, भिकाराम जगताप, अंबादास राऊत, रमेश गावंडे, पंजाबराव सुर्वे, मुकूंदा दाते, सौ. रेखाताई टोपले, लोमेश पाटील चौधरी,उमेश अनसाने,अश्विन जगताप, नंदकिशोर कव्हळकर, माणिकराव हांडे, उमेश अनासाने, विजय खंडार,रोहीत महाजन,कैलास हांडे, श्याम घारु,गोंधळी कलाकार सुरेश हांडे, सौ सिमाताई सातपुते, सौ शारदाताई भुयार, सौ छायाताई गावंडे, सौ कृपाताई ठाकरे, श्रीमती कांताबाई लोखंडे, सौ. इंदिराबाई मात्रे, आदींची उपस्थिती होती. तसेच कलावंतांच्या न्याय हक्कासाठी जिल्हयातील कलावंतांनी गट-तट आणि राजकिय पक्ष विसरुन या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक तथा लोककलावंत संजय कडोळे यांनी केले आहे.
वाशिम : जिल्हयातील सर्व मान्यता प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल 2022 व्दारे खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळांमधील रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रीया सुरु आहे. ज्या संस्थांना पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांचे रिक्त पदे भरावयाची आहे. त्यांनी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देवून शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व माहिती भरावी. पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे. ही प्रक्रीया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे. याबाबत काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा माध्यमिक कार्यालय,जिल्हा परिषद, वाशिम येथे संपर्क करावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.
जि.प. अनुकंपाधारकांची प्रतिक्षा यादी नोटीस बोर्डवर उपलब्ध ! विहीत मुदतीत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
वाशिम : जिल्हा परिषद,वाशिम अंतर्गत अनुकंपाधारकांची डिसेंबर 2023 अखेरची प्रतिक्षा यादी www.zpwashim.in या संकेतस्थळावर व सामान्य प्रशासन विभाग,जि.प.वाशिमच्या नोटीस बोर्डवर उपलध्द आहे. या यादीवर संबंधित उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास आदेशाच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत सामान्य प्रशासन विभाग, जि.प.वाशिम येथे हस्तलिखीत पुराव्यासह नोंदविणे आवश्यक आहे. विहीत कालावधीनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास या आक्षेपावर विचार करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या