लोकसभा निवडणुकीची तयारी, लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने होणार महायुती- आ.सावरकर
अकोला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 45 लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने महायुतीची जय्यत तयारी सुरू असून अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने आज महायुतीची बैठक आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जिल्हाभर विविध कार्यक्रम संयुक्तरीत्या राबवण्याचा निर्णय घेऊन महायुतीच्या कामकाज व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामकाज 14 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला संयुक्त मेळावा वेगवेगळे कार्यक्रम होणार असून यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला .
या बैठकीत आमदार वसंत खंडेलवाल, आमदार तुकाराम बिडकर विजय देशमुख श्रीरंग दादा पिंजरकर, कृष्णा अंधारे किशोर पाटील विजय अग्रवाल, विठ्ठल सरप, अश्विन नवले, गोपी किसन बाजोरिया, योगेश अग्रवाल निखिल ठाकूर गौरव देशमुख माधव मानकर जयंत मसने, संजय गोटफोडे, अवचार, रमेश गायकवाड शशी चोपडे, गिरीश जोशी, संतोष अनासने, रामदासहरणे विनोद थुटे राजकुमार अमानकर मनोज पाटील गावंडे संदीप पत्की , उपस्थित होते यावेळी विजय देशमुख तुकाराम बिडकर कृष्णा अंधारे वसंत खंडेलवाल यांनी वेगवेगळी माहिती देऊन संयुक्तरीत्या काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले विजय अग्रवाल यांच्याकडे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे . लवकरच पंधरा पक्षाचा महायुतीचा मेळावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी पुन्हा विराजमान करण्याचा संकल्प घेण्यात येणार आहे व अकोला लोकसभा मतदारसंघात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवण्याचा दृष्टीने जय तयारी करण्यात या सुरू करण्यात आली आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या