नमो चषक स्पर्धा अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन
अकोला- अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा नमो चषक स्पर्धा अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन उमरी येथील स्वर्गीय लक्ष्मण दादा जंगम स्टेडियम मोठी उमरी येथे आयोजित करण्यात आले आहे दिनांक 27 व 28 जानेवारी रोजी होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला 51 हजार द्वितीय क्रमांकाला 31 हजार तर 3 क्रमांकाला एकवीस हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे असल्याची माहिती शहर भाजपा अध्यक्ष जयंत मसने किशोर पाटील पाटील, व पवन महल्ले वैभव माहोरे संतोष शिवरकर उपसभापती अकोट पंचायत समिती यांनी दिली,. खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात नमो चषक अंतर्गत दोन लाख पेक्षा जास्त युवक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत असून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या नियोजनाने अकोला पूर्व आणि पश्चिम मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा सुरू असून जिल्ह्यात अकोट मध्ये आमदारप्रकाश भारसाकले, ग्रामीण भाग मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात आमदारहरीश पिंपळे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. अकोला पूर्व आणि पश्चिम मध्ये क्रिकेट स्पर्धा बोरगाव मंजू आणि एकविरा मैदानावर सुरू आहे तर बॉडी बिल्डर स्पर्धा करण्यात आली आहे व पतंग स्पर्धा रांगोळी स्पर्धा मोठ्या प्रमाणात संपन्न होऊन एकूण 27 स्पर्धा होत आहे अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कबड्डी अकोला जिल्ह्यासाठी लोकप्रिय खेळ असून भाजपाचे अकोला पश्चिम चे आमदार स्वर्गीय गोवर्धन शर्मा हे सुद्धा कबड्डी खेळाडू होते. केळीवेळी ही माहेरघर म्हणून ओळखल्या जाते अनेक कबड्डी स्पर्धा अकोल्यात असून त्या खेळाडूंच्या मार्गदर्शनात ही कबड्डी स्पर्धा होत असून ग्रामीण आणि शहरी भागातील कबड्डी टीमने भाग घ्यावा व यासाठी जयंत बसले आणि नावकार संदीप गावंडे संतोष शिवरकर मिलिंद राऊत पवन महल्ले वैभव माहोरे यांच्याशी संपर्क साधावा व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकोला लोकसभा भाजपा प्रमुख अनुप धोत्रे यांची चमु कार्य रत आहे. 27 व 28 जानेवारी होणाऱ्या स्पर्धेमध्ये नामवंत शामिल होणार आहे अशीही जयतमसने यांनी सांगितले.
0 टिप्पण्या