Ticker

6/recent/ticker-posts

पुढील २४ तासात पावसाची शक्यता, बघा कुठे - कसा पडणार पाऊस.. 

पुढील २४ तासात पावसाची शक्यता, बघा कुठे - कसा पडणार पाऊस.. 


अकोला : नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या  संदेशानुसार, दि. २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अकोला जिल्‍ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला येथील हवामान तज्ञ व अभ्यासक श्रीकांत लांडे सर 
यांच्या माहीती नुसार  नोव्हेंबर 29,30, तर डिसेंबर 1 च्या दरम्यान अमरावती, अकोला,  नागपूर, नाशिक, बुलढाणा, वाशिम, वर्धा, बिड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड औरंगाबाद, जालना, यवतमाळ, ठाणे या पट्याच्या आजू बाजूच्या जिल्ह्यात रात्री च्या वेळेस कमी मध्यम प्रमाणात पाऊस राहील.


वीज व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. या स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाने सूचित केले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या