Ticker

6/recent/ticker-posts

कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्यांना निंबू सरबत पाजून आ.सावरकर यांनी सोडविले उपोषण 

कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्यांना निंबू सरबत पाजून आ.सावरकर यांनी सोडविले उपोषण 


अकोला

 महादेव कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व समाजाच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण सदैव कटीबद्द आहोत व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सदैव तत्पर राहू अशी ग्वाही आमदार रणधीर सावरकर यांनी देऊन गेल्या ५ दिवसांपासून सुरु असलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्यांना निंबू सरबत पाजून उपोषण सोडविले.


 बेरार प्रांत मधील अमरावती विभागातील जोली महादेव जमातीला त्याकाळी मिळणाऱ्या आदिवासी सौलती कायम ठेवावी. १८५३ ते १९०३ पर्यंत महादेव कोळी समाजाला सौलती मिळत होत्या परंतु महादेव कोळी समाज अनुसूचित जमातीच्या मुलभूत हकांपासून वंचित राहत असून दरी डोंगरी मध्ये सातपुडा व अजिंठा डोंगरामध्ये राहणारे कोळी समाजाला बुलढाणा अकोला अमरावती सौलती मिळत नाही या साठी अनेक दिवसांपासुन आंदोलन चालू असून या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात व बाहेर सातत्याने न्याय मुलावून देण्याचे काम केले व अनेक प्रश्न मार्गी लावले परंतु महत्वाचा प्रश्न राहिल्या मुळे महादेव कोळी समाजाच्या वतीने बाळासाहेब अपोतीकर यांचे नेतृत्वात संदीप बगाडे, मंगेश बुटे, संजय बुटे यांनी २६ ऑक्टोबर २०२३ पासून उपोषण सुरु केले होते. या वेळी उपोषण मंडपाला भेटदेऊन आमदार सावरकर यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेऊन महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला देण्याशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली व राज्य शासनाकडे पातुपुरावा करून अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या भागातील बांधवांना न्याय मिळवून देण्याचे अभिवचन दिले. या अंतर्गत आज आमदार रणधीर सावरकर व अकोला लोकसभा भाजपा प्रमुख अनुप संजय धोत्रे, विजय अग्रवाल, जयंत मसने, बाळासाहेब अपोतीकर, राजेश बेले, देवेंद्र देवर, आदींच्या उपस्थितीत उपोषण सोडविले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच राज्य शासन या संदर्भात पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. डॉ महेंद्र काळे,अरुण किरडे,अनिल फुकट,रघुनाथ खडसे,शाम तरोळे,सुधाकर घुगरे,दादाराव पेटे,सचिन रामाघरे मंगेश ताडे, प्रशांत आढे, अनंत कुटेमाटे,विजय बूटे,अमोल तुरुक,योगेश किरडे, निलेश बगाडे,सचिन वडाळ,संतोष धोत्रे,बळीराम भांडे,ज्ञानेश्वर आढे,विनोद आपोतीकर,शिवा महाराज भांडे,सूरज बोपटे, बाबाराव पाटील,नितीन आपोतीकर , निलेश निनोरे, अद्व्ह्केट देवाशिष काकड, अंबादास उमाळे, विठ्ठल चतरकर, गणेश अंधारे, अमोल गीते, अक्षय जोशी, धनंजय धाबले, भरत काळमेघ, संजय पाटील, किशोर कुचके, गणेश तायडे, चंदू खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या