बॉलीवूड किंग बादशाह शाहरुख खानने मानले अकोल्याचे आभार
बॉलीवूडच किंग बादशाह शाहरुख खान याने अकोल्याचे आभार व्यक्त केले आहे. जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अकोल्याच्या मिराज सिनेमा येथे प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. अकोल्यातील मिराज सिनेमा या ठिकाणचा व्हिडिओ शेअर करत शाहरुख खानने अकोलेकरांचे आभार मानले असून असेच प्रेम करत रहा, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
सविस्तर विडीओ इथे 👆 पहावा...
बॉलीवूड किंग म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवान चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गेल्या दोन दिवसांपासून सिनेमागृहात गर्दी करत आहेत. या चित्रपटाला सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सिनेमागृह प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. सिनेमागृहात हाऊस फुल चे फलक लागत असल्याने जवान चित्रपट चांगलीच कमाई करीत आहे, प्रेक्षक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहायला मिळते. अकोल्यातील मिराज सिनेमागृह येथे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हाउसफुल्ल सुरू आहे. याचा एक व्हिडिओ चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांनी व्हायरल केला असून अकोलेकरांचे आभार मानले आहेत. Thank u Akola. you and what a huge banner. Feeling all like a big star now!! Love u and be happy always. असे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या