Ticker

6/recent/ticker-posts

प.पु.नारायण महाराज ज्ञानमंदीर व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रगती गौरवास्पद !"-, आ.अँड. किरणराव सरनाईक

प.पु.नारायण महाराज ज्ञानमंदीर व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रगती गौरवास्पद !"-, आ.अँड. किरणराव सरनाईक


          "प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि आधुनिक तंत्रयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन व पालक सभा


 कारंजा :  प.पू.नारायण आणि श्री गुरु भारती यांच्या प्रेरणाशिर्वादाने अनेक वर्ष स्थानिक रंगारीपूरा येथील प.पू. नारायण महाराज मंदिर कारंजा येथे स्थापना होऊन प्रारंभ झालेल्या,कारंजा येथील प.पू.नारायण महाराज ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कारंजा यांना,अगोदर इ. सन 2013-14 मध्ये इयत्ता पहिली व पाचव्या इयत्तेला व सन 2017-18 मध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता बारावीला मान्यता मिळाली आणि संस्थेचे स्थानांतरण,मुर्तिजापूर मार्गावरील भिलखेडा परिसरातील नविन सुसज्ज अशा वास्तूमध्ये करण्यात आले.अथक परिश्रम करून यशस्वी विद्यार्थी घडविणारे शिक्षक व शिक्षीका मिळाल्यामुळे,दिवसेंदिवस शाळेची प्रगती होत असल्याचे दृष्टिपथास येत आहे.इंग्रजी माध्यमाच्या या शाळेचे नुकतेच डिजीटलीकरण सुद्धा करण्यात येऊन संस्थेला आदर्श अशी डिजीटल शाळा करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.त्या दृष्टिनेच कारंजा येथील आपल्या संस्थेत यशस्वी आदर्श विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि आधुनिक तंत्रयुक्त वर्गाचे (डिजीटल क्लास रूमचे) उद्घाटन आणि पालक सभेचे भव्य आयोजन,शुक्रवार दि. 08 सप्टेंबर 2023 रोजी केले होते.


 या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे सदस्य लोकप्रिय व लाडके शिक्षक आमदार  अँड. किरणरावजी सरनाईक हे होते तर उद्घाटक म्हणून सेवनिवृत्त प्राचार्य आणि शैक्षणिक व सामाजिक प्रश्नाची जाण असलेले गाढे अभ्यासक डॉ.के.बी. देशमुख सर होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  पंचायत समिती कारंजाचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने,प.पु.नारायण महाराज ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबारावजी नेमाने मा.तारांगण इंग्लिश स्कूल धनजचे उध्वरावजी इंगळे,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे,गायत्री परिवार हरिद्वारचे सदस्य नामदेवरावजी मुंदे,शाळेचे सचिव संजय नेमाने सर, मुख्याध्यापिका कु.गायत्री नेमाने मॅडम इत्यादी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते दिपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात येऊन आधुनिक तंत्र प्रयोग शाळेचे डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात येऊन मान्यवरांनी सर्वसाक्षीने उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.त्यानंतर विद्यार्थ्यानी सुमधूर स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच संस्थेचे सचिव संजय नेमाने यांचे हस्ते आ.किरणरावजी सरनाईक से. नि.प्राचार्य डॉ.के.बी.देशमुख यांचे शाल,श्रीफळ,पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत पालकमंडळीचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर  संस्थेचे सचिव संजय नेमाने यांनी आपल्या प्रास्ताविकामधून संस्थेच्या स्थापने पासूनची संपूर्ण माहिती व उपक्रमाची माहिती दिली आणि संस्थेच्या प्रगतीचे श्रेय,शिलेदार ठरलेल्या शिक्षकवृंद आणि विद्यार्थी पालकांना दिले.


       त्या नंतर याप्रसंगी लोकप्रिय शिक्षक आमदार अँड सरनाईक व मान्यवरांचे हस्ते,प.पू.नारायण महाराज  ज्ञानमंदिरमधून इयत्ता बारावीत पहिली आलेली कु.उन्नती विठ्ठलराव हांडे,इयत्ता दहावीत पहिला आलेला ऋशिकेष शिंदे,भारतीय सांस्कृतिक ज्ञान परीक्षा हरिद्वारच्या परीक्षेमध्ये राज्यातून द्वितीय आलेली कु.गौरी अजय नेमाने,तसेच नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड दिल्ली येथून गोल्ड मेडल मिळालेले विद्यार्थी कु. वैष्णवी गजानन शिरसाट (वर्ग ९), साहद सलीम चौधरी (वर्ग ९),शांतनु भारत राठोड (वर्ग ९), कु. श्रद्धा भूषण लळे (इयत्ता ४) आरव गोपाल वक्ते (इयत्ता २), कु. मंजिरी सुनील रोठे (इयत्ता २) इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र,शाळेकडून भेट व पुष्पगुच्छ देवून गुणगौरव करीत, शुभेच्छा देवून करण्यात आला. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या वर्ग सजावटीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला वर्ग नववा वर्गशिक्षिका कु.शिवानी प्रमोद गोंडाळ, द्वितीय क्रमांक मिळवलेला वर्ग तिसरा वर्गशिक्षिका कु. सोनाली किरण शाहाकार, तसेच तृतीय क्रमांक मिळालेल्या वर्ग पाचवी वर्गशिक्षिका कु. प्रिया उद्धवराव लळे, त्याचबरोबर शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.के. बी. देशमुख,गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी आपल्या मनोगता मधून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करीत बाल विद्यार्थ्यांना आणि नुकत्याच 5 सप्टेंबर रोजी झालेल्या शिक्षक दिना बद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.    


  आपल्या अध्यक्षीय संभाषणातून बोलतांना आ.अँड किरणराव सरनाईक यांनी संस्थेचे संचालक व शिक्षक शिक्षीका घेत असलेल्या परिश्रमाची विशेष दखल घेऊन त्यांचे अभिनंदन करून,एवढ्या अत्यल्प कालावधी मध्ये कारंजा सारख्या शैक्षणिक पंढरीमध्ये संस्थेने घेतलेल्या उंच भरारीचा विशेष उल्लेख केला. आणि संस्थेला भविष्यात वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन देत,शाळेच्या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे सुद्धा आश्वासित केले. 
   या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक  निखिल घुगे,विकी शिरसाट तसेच शिक्षिका शिल्पा नेमाने,कविता देशमुख,राखी जिचकार,सरला कडोळे,तृप्ती उखळकर,दिपाली कदम,मुस्कान नंदावाले,सोनाली शहाकार,वैष्णवी हजारे,प्रिया लळे,वैष्णवी लव्हाळे,शिवानी गोंडाळ,उत्कर्षा हांडे,समीक्षा घोगरे,श्रुती बंगाले,अंजली साखरकर,अंकिता आसरकर व निराली रौरासे यांनी हातभार लावला.पालक सभे करीता आलेल्या पालकांना शिक्षक वृंदानी आपला परिचय देत विद्यार्थ्यांचा गृहपाठ करून घेण्या बाबत सूचना दिल्या.कार्यक्रमाचे संचलन तृप्ती उखळकर यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी गोंडाळ यांनी केले.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या