Ticker

6/recent/ticker-posts

माहेरी आलेली मुलगी आपल्या मुलांसह निघून गेली ; आईची पोलिसात तक्रार

माहेरी आलेली मुलगी आपल्या मुलांसह निघून गेली ; आईची पोलिसात तक्रार



मुर्तीजापुर प्रतिनिधी:  संतोष माने

तालुक्यातील ग्राम किनखेड माहेरी आईकडे आलेली २८ वर्षीय मुलगी आपल्या दोन पाल्यासह सासरकडे रोटा वर जातो असे सांगून गेलेली अद्याप पर्यंत माहेरी परत न आल्यामुळे मुलीच्या आईने तक्रार दिली.


ग्रामीण पोलिसांकडून आज प्राप्त माहितीनुसार सौ. रेखा नामदेव टाले वय ४५ वर्ष राहणार किनखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी सौ निकिता नितेश मुरादे वय २८ व तिची ७ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाच्या मुलासह सासरच्या मंडळी कडे असलेल्या रोडग्याच्या जेवनाच्या कार्यक्रमाकरीता जाते असे सांगून घरून गेली परंतु माहेरी परत न आल्याने नातेवाईकाकडे विचारपूस केली असता शोधा शोध घेतला कुठेच मिळून न आल्याने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली.याबाबत ग्रामीण पोलिसांनी मिक्सिंग दाखल करून फोटो वरील व्यक्ती मिळून आल्यास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करायचे आव्हान केले. पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड. कॉ.संजय अंभोरे करीत आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या