भाजपा महानगराच्यावतीने ऍक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबिराचे आयोजन
माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर,आ गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर मांगटे,अनुप धोत्रे, अनुप शर्मा, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, सौ सुहासिनी धोत्रे , चंदा शर्मा, मंजुषा सावरकर, जयंत मसने, डॉक्टर किशोर मालोकार, महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे, संजय जीरापुरे, डॉ विनोद बोर्डे,संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत जोधपूर येथील सुप्रसिद्ध एक्यूप्रेशर व सुजोग थेरपी तज्ञ श्री मेघराज जाखड यांचे ॲक्युप्रेशर व सुजोग थेरपी शिबिराचे उद्घाटन जनता होमिओपॅथिक कॉलेज परिसरात करण्यात आले
याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी आजच्या आधुनिक दिनचर्या मध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ जपण्याकरिता ॲक्युप्रेशर व सुजोकथेरेपीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व आज मनुष्य हा घड्याळाच्या काट्यामागे सतत धावत असून प्रत्येकाला आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले व या शिबिराचा समस्त नागरिकांनी व पदाधिकारी यांनी दिनांक 13 डिसेंबर पर्यंत लाभ घ्यावा असे आवाहन केले. जोधपूर येथील ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अँड ट्रीटमेंट इन्स्टिट्यूट येथील सुप्रसिद्ध थेरपीस्ट श्री मेघराज जाखड तसेच त्यांचा चमू भुराराम चौधरी, लोकेंद्र पवार,सोहनलाल भादू यांचा चमू दिनांक 7 डिसेंबर 2022 पासून ते दिनांक 13 डिसेंबर 2022 पर्यंत रोज सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते रात्री 8 वा पर्यंत जनता होमिओपॅथीक कॉलेज राम नगर जनतेच्या सेवेमध्ये सदरहू शिबिरामध्ये आपली सेवा देणार आहेत
अकोला शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपले स्वास्थ जपावे असे आवाहन मेघराज जाखड यांनी केले
याप्रसंगी माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार सुमन गावंडे, गीतांजली शेगोकार, रश्मी अवचार, आम्रपाली उपरवट, रंजना विंचनकर जानवी डोंगरे, निकिता देशमुख, घोगलिया ,शारदा ढोरे ,वर्षा गावंडे सोनिया काळे ,मंडळ अध्यक्ष adv देवाशिष काकड,गणेश अंधारे ,संतोष पांडे, निलेश निनोरे, अमोल गोगे, राजेंद्र गिरी, हरिभाऊ काळे, विवेक भरणे, गणेश सारसे, अमोल गीते, सागर शेगोकार, विनोद मापारी हरीश काळे,धनंजय धाबाले, सतीश ढगे श्याम विंचनकर अनिल नावकार, सुभाष खंडारे, विजय इंगळे प्रशांत अवचार, संतोष डोंगरे ,अजय शर्मा, राहुल देशमुख ,प्रकाश घोगलिया, रमेश करिहार, विवेक भरणे, प्रकाश रेड्डी उमेश श्रीवास्तव संदीप गावंडे, आकाश ठाकरे ,अभिजीत कडू ,केशव हेडा, ऋषिकेश पोकळे, शुभम चंदन, प्रवीण पोटे, शिवम ठाकूर,विक्रम पवार, हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस माधव मानकर यांनी केले
0 टिप्पण्या