स्व.डॅडी देशमुख स्मृतीप्रित्यर्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी ' रंग भरो स्पर्धा '
——————————————
ललित कला अँकेडमी व बाबूजी देशमुख वाचनालयाचे आयोजन
——————————————
अकोला—सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान राहिलेले,अकोला नगरीचे माजी नगराध्यक्ष स्व.डॅडी देशमुख यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधुन ललित कला अँकेडमी व बाबूजी देशमुख वाचनालय अकोला यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंग भरो स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा रविवार दि.१७जुलै२०२२ ला सकाळी९ ते१०या वेळेत वर्ग ५ते७ `अ गट 'व वर्ग ८ते १० ' ब गट ' अशी होईल.स्पर्धेचे ठिकाण न्यु इंग्लिश हायस्कुल,मराठा मंडळ सभागृहाजवळ,स्टेशन रोड,श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा हरिहरपेठ व श्री बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय,माळी भवन,ज्योती नगर,जठारपेठ अकोला येथे संपन्न होईल.स्पर्धेसाठी चित्र आयोजकांतर्फे देण्यात येईल.शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची गटनिहाय यादी दि.१५ जुलै २०२२ पर्यंत बाबूजी देशमुख वाचनालय,टिळक रोड,अकोला येथे श्री.सतीष डगवाले यांचेजवळ सकाळी ८ते ११ व सायं ४ते ८या वेळेत जमा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या