Ticker

6/recent/ticker-posts

ईदगाह वर भर उन्हात ईद सन उत्साहात साजरा

ईदगाह वर भर उन्हात ईद सन उत्साहात साजरा


महिन्याभराच्या उपवासानंतर आज मुस्लिम बांधवांनी रमजान ईद आनंदात साजरी केली. जिल्ह्यात सर्वत्र ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हरिहर पेठ येथील ईदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्यात. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. मुस्लिम बांधवांचा रमजान महिना संपल्यानंतर ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सकाळी नमाज पठण केली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. शिरखुरमाचाही आनंद मुस्लिम बांधवांनी घेतला. दरम्यान, हरिहर पेठ येथे जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत मुस्लिम बांधवांचे हरिहर पेठ येथील ईदगाह परिसरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नागरिकांनी शांततेत नमाज पठण केली. 


 ईद निमित्ताने निशाणही काढण्यात आले. हजारो मुस्लिम बांधव त्यामध्ये सहभागी झाले होते. यानिमित्ताने वाहतुकीत बदलही करण्यात आले होते. ठिकठिकाणी निशाणचे स्वागत करण्यात आले. तसेच राजकीय पक्षांतर्फेही मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत होते. तसेच शिखरमाही सेवन करण्यात आले. बच्चे कंपनीला ईदीचेही वितरण करण्यात आले. मोहम्मद अली रोड परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या