Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजपाच्यावतीने शिवनी विमानतळावर जोरदार स्वागत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजपाच्यावतीने शिवनी विमानतळावर जोरदार स्वागत


अकोला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आज अकोला जिल्हा भाजपाच्यावतीने शिवनी विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणीयांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.


यावेळी आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवालआमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार राजेंद्र पाटणी आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात, माधव मानकर संजय गोटेफोडे संजय जिरापुरे , संजय गोडा, अमोलगोगे, गणेश अंधारे, राजेंद्र गिरी, सतोष पांडे निलेश नीनोरे. उमेश गुजर अमोल गीते डॉक्टर शंकरराव वाकोडे अंबादास उमाळे प्रवीण हगवणे, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी अकोला वाशिम जिल्ह्यातील विविध विकास कामासंदर्भात चर्चा व निवेदन करण्यात आली



अकोला जिल्हा शेती उद्योगावर आधारित कारखाने असून केंद्र सरकारने यासाठी विशेष योजना पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी करावी 


अकोला
अकोला जिल्हा शेती उद्योगावर आधारित कारखाने असून केंद्र सरकारने यासाठी विशेष योजना पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी करावी तसेच राज्य सरकारने खंडवा अकोट रेल्वे मार्ग थांबवला त्यासंदर्भात, अकोला विमानतळाला सुरू करण्याच्या दृष्टीने व उड्डाण योजनेत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने, तसेच विशेष रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी सूक्ष्म व लघु उद्योगाच्या माध्यमातून योजना अकोला जिल्हा अकोला लोकसभा मतदारसंघ मतदार संघात सुरू करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे निवेदन देऊन केली.
अकोला बुलढाणा वाशीम अमरावती हा भात शेती उद्योगावर आधारित उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध असून यासाठी केंद्र सरकार आणि विशेष पॅकेज जाहीर करावा तसेच अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक व मेडिकल हब विशेष शैक्षणिक चळवळ व कॉलेज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा तसेच अकोला विमानतळ विस्तारीकरण करून उडान सेवेमध्ये याचा समाविष्ट करून अकोल्यात व पाचहे शहर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वसलेले आहे हे तुम्हाला माहीत आहे. अकोला (शिवानी) जिल्हा अकोला विमानतळ हे 1943 मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्र सरकारच्या (Air Port Authority of India ltd) नागरी विमान वाहतूक विभागाचे सर्वात जुने विमानतळ आहे.
 अकोला हे पश्चिम विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेशमधील एक प्रसिद्ध धान्य आणि किराणा मार्केट शहर आहे, मध्यप्रदेशातील प्रमुख, लघु/मध्यम उद्योग व्यवसायासाठी अकोल्याला भेट देत असत. अकोला शहर हे राष्ट्रीय महामार्ग 6 तसेच मध्य आणि दक्षिण रेल्वेवरील प्रमुख जंक्शन आहे. वाशिम - बुलढाणा - अमरावती (अंशत:) जिल्ह्यांतील लोकांना विमानसेवेचा लाभ घेणे खूप सोपे आणि सोयीचे होईल. शेगाव (संतनगरी) येथे वर्षभर लाखो भाविक येत असत. शेगाव हे केवळ विदर्भाचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे तसेच इतर लगतच्या राज्यांचे प्रमुख आकर्षण आहे, अकोला हे चिखलदरा, सातपुडा व्याघ्र प्रकल्प, नरनाळा किल्ला, काटेपूर्णा अभयारण्य येथे भेट देण्याचे केंद्रस्थान आहे जिथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असत.


  अकोला शहरापासून नागपूर आणि औरंगाबाद विमानतळ 250 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत. लगतच्या चार जिल्ह्यांतील प्रवासी वाहतुकीच्या ताणामुळे अकोल्यातील रेल्वेही प्रवाशांना सहज उपलब्ध होत नाही. या पार्श्‍वभूमीवर अकोला (शिवणी) विमानतळाचा विकास करून हवाई वाहतूक सुरू करणे अत्यावश्यक आहे.
   सर्व हंगामात एटीआर-73 प्रकारच्या विमानांच्या लँडिंगसाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1400 मीटरवरून 1800 मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीची एकूण 60.68 हेक्टर जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. भारतीय हवाई बंदर प्राधिकरणाने माहिती दिली आहे की धावपट्टीच्या विस्तारासाठी अतिरिक्त 22.24 हेक्टर खाजगी जमीन आवश्यक आहे. अतिरिक्त खासगी जमीन संपादित केल्याशिवाय विमानतळाचा विकास शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराचे काम खासगी जमीन संपादनास दिरंगाईमुळे रखडले आहे. अतिरिक्त भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही राज्य सरकारला अनेक वेळा पत्र लिहिले आहे परंतु राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
 तथापि, आम्ही विनंती करतो की सध्याच्या 1400 मीटरच्या धावपट्टीच्या लांबीसह एटीआर प्रकारची विमान सेवा तात्काळ नियमितपणे सुरू केली जाऊ शकते. आपण कृपया वैयक्तिकरित्या या संदर्भात योग्य अधिकार्‍यांकडे लक्ष देऊन प्रकरण मांडले तर पश्‍चिम विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल . जिल्ह्याला विमानतळाची सेवेचा लाभ मिळवून द्यावा. अकोट या रेल्वे मार्गातील अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून यामुळे मधील अडचण दूर करण्यात यावी. अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने आज जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणघीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे तेजराव थोरात माधव मानकर, संजय गोटेफोडे संजय जिरापुरे संजय गोडा श्रावण इंगळे अंबादास उमाळे डॉक्टर शंकरराव वाकोडे, गणेश अंधारे राजेंद्र गिरी अमोल गोगे निलेशनीनोरे चंदा शर्मा विनोद बोराडे, आदींनी केली


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या