कबड्डी हा मैदानी खेळ युवकांचे आरोग्य आणि सामाजिक सलोखा सांभाळतो --आमदार बळवंत वानखडे
तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत खंडेलवाल महाविद्यालयाचा संघ ठरला विजेता
अकोला -- राज्यातील ग्रामीण भागातील लोकांचा महत्वाचा मैदानी खेळ म्हणून कबड्डी ला ओळखले जाते या खेळाचे प्रमुख आकर्षण युवकांना मोठया प्रमाणावर आहे या खेळात कोणत्याही प्रकारची जात पात, पंथ ,धर्म पाळला जात नाही त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांच्या आरोग्याचे रक्षण कबड्डी हा खेळ करतो तर हाच मैदानी खेळ कबड्डीमुळे सामाजिक सलोखा सांभाळला जातो असे मत दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते नाणेफेक करून कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी प्रारंभ करतांना त्यांनी मत व्यक्त केले.
जुने शहरातील डाबकी रोड स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकोला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवसीय कबड्डीचे सामने आयोजित केले होते या सामान्यांसाठी जिल्हाभरातील कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेतील अंतिम सामना काल 17 एप्रिल ला उशिरा रात्री खेळवला गेला .या अंतिम सामन्याची नाणेफेक दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडेच्या हस्ते करून अंतिम सामना प्रारंभ केला गेला या सामन्यात खंडेलवाल महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला असून या विजेत्या कबड्डी संघाला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रप्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी रोख 31 हजार रुपये देऊन प्रथम बक्षीस दिले तर या सामन्यात उपविजेता ठरलेल्या कबड्डी संघाला अकोला महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे यांनी द्वितीय क्रमांकाचे रोख 21 हजार रुपयेचे बक्षीस दिले आहे तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या कबड्डी संघाला भीमनगर मित्र मंडळाने रोख रक्कम 11 हजार रुपये चे बक्षीस दिले आहे. या सामन्यांच्या बक्षिस वितरण सोहळा च्य अध्यक्षस्थानी हे होते तर व्यासपीठावर यांची प्रमुख उपस्थिती होती.फजलू पहेलवान, कमिटीचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे , अभिलाष तायडे, विवेक पारसकर , अहमद इराणी, महेंद्र गवई, माणकीकर वासुदेव नेरकर, कवडे, अहिरे , त्र्यंबकदादा शिरसाट, गौतम गवई, हे होते या कबड्डी सामन्याच्या कार्यक्रमाचे आयोजक आकाश शिरसाट हे होते
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या