Ticker

6/recent/ticker-posts

जयभवानी जयमल्हारची झाली शेगावयात्रा

जयभवानी जयमल्हारची झाली शेगावयात्रा
   

                 
वाशिम: गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीच्या संचारबंदीमुळे, वाशीम जिल्ह्यातिल कारंजा येथील "जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची" "श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र शेगाव व श्रीक्षेत्र वझेगाव यात्रा पालखी दिंडी सोहळा" होऊ शकलेला नव्हता . या पाश्वभूमिवर श्री संत गजानन महाराज भक्त मंडळीच्या विनंतीवरून दिडी प्रमुख संजय कडोळे यांनी श्रीक्षेत्र शेगाव संस्थानच्या विश्वस्त मंडळीना अनुमती मागीतली असता त्यांनी मोठया मनाने मोजक्या व्यक्तिंची दिंडी आणण्यास परवानगी दिल्यामुळे नुकतीच जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची श्रीक्षेत्र कारंजा ते श्री संत गजानन महाराज संस्थान श्रीक्षेत्र शेगाव व परमहंस श्री रामचंद्र महाराज संस्थान श्रीक्षेत्र वझेगाव येथे दिंडी सोहळा नेण्यात आला होता असे वृत्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील खंडार व उपाध्यक्ष उमेश अनासाने यांनी कळविले असून,


 दिंडीप्रमुख संजय कडोळे सह मेघन जुमळे, दुर्गाबाई कडोळे, डॉ कुसुमताई जुमळे, सौ संगीता कडोळे व इतर कारंजा,उमरी, अकोला येथील वारकरी मंडळी यांनी संत गजानन महाराज संस्थानने दिलेल्या ऑनलाईन पासेसप्रमाणे वेगवेगळ्या वेळेत जाऊन श्रीदर्शनाचा लाभ घेतला . दर्शनानंतर वारकऱ्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसत होता व त्यांचेकडून मानसिक समाधानाची अनुभूती मिळत होती.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या