Ticker

6/recent/ticker-posts

संत रविदास महाराज जयंती बी आर सी एफ कडून साजरी

संत रविदास महाराज जयंती बी आर सी एफ कडून साजरी



अकोला . मानवतावादी क्रांतिकारक संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 645 वी जयंती भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन बी आर सी एफ विदर्भ विभाग अकोला सुधीर कॉलनी चौकातील रुद्र प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विदर्भ विभागीय अध्यक्ष मधुकर वानेडकर होते जिल्हा अध्यक्ष मेघशाम ठोसरे यांनी दीप प्रज्वलित करुन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे  उद्घघाटन केले प्रास्ताविक प्राध्यापक गजानन  पदमने यांनी केले प्रमुख अतिथी  व्याख्याता ॲडव्होकेट अनिल लव्हाळे  होते प्रमुख वक्ते प्राध्यापक गजानन वजीरे प्राध्यापक डॉ धनंजय खिराडे  पत्रकार प्रदीप खाडे डॉक्टर कल्याणी पद्मने महिला प्रमुख लीना ताई चिम यांची संत रविदास महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रभावशाली भाषणे झाली चौदाव्या शतकात मानवता समता बंधुत्व निर्माण व्हावी याकरिता दोहे  लिहून समाजजागृती केल्याचे सांगितले संत रविदास महाराज जीवन चरित्रावर विद्यार्थ्यां करिता निबंध स्पर्धा घेण्यात आली 1निकिता जितेंद्र रेवस्कर 2 कुमारी ज्योत्स्ना सुधाकर आगलावे 3 चिरंजीव तन्मय प्रवीण देव 4 परिनिधी भूषण खंडारे 5 वर्षा संतोष खंडारे या पाच विद्यार्थ्यांना अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.


 1 पांडुरंग चोपडे पदोन्नती 2  विष्णू वाडेकर सेवानिवृत्त 3 महादेवराव कळसकर सेवानिवृत्त 4 मधुसूदन गव्हाळे समाज कार्य 5 जयंत राजगुरू समाजकार्य यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषण मधुकर वानेडकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन गव्हाळे आभार प्रदर्शन महासचिव गजानन काकडे यांनी केले
 कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निरंजन  गव्हाळे सारंगधर डाखोडे महादेव राव इंगळे गौरव गव्हाळे विष्णू वाडेकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.



भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशनच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा         

      रुद्र हनुमान मंदिर अकोला येथे बी आर सी एफ च्या वतीने दिनांक 19/ 2/ 2022 रोजी छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री मधुकरराव   वानेडकर विदर्भ अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन पूजन करून हारार्पण करण्यात आले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विदर्भ अध्यक्ष श्री मधुकरराव  वानेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेवर आधारित विचारांची आज समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर प्रमुख वक्ते श्रीरामजी शेगोकार प्राध्यापक खंडारे साहेब प्राध्यापक गजानन पद् मने ,मेघश्यामजी ठोसरे, श्रीरामजी राखोंडे यांनी शिवचरित्रावर आपले विचार व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राध्यापक धनंजय खिराळे यांनी  शिवकालीन धर्मनिरपेक्षतेवर प्रकाश टाकला.
    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मधुसूदन गव्हाळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गजानन काकडे यांनी केले कार्यक्रमास   बहुसंख्य मंडळी उपस्थित होती. श्री किशोर राजगुरू, लक्ष्मणराव पद्मने,  श्री कृष्ण गवई ,प्रकाश चापके, सूर्यप्रकाश चंदन, ओंकारराव चिमणकर विजय भटकर के.टी. पद्मने ,नरहरी राजगुरू, ईशांन चापके,  विष्णू वाडेकर ओमकार धुमाळे, विशाल  गव्हाळे, आत्माराम भटकर ,महादेव इंगळे,  प्रामुख्याने उपस्थित होती.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या