महिला परीचरांचा आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघ र.न. N.G.P. 3980 प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्र सेवारत अशंकालीन महिला परीचर यांचे जिव्हाळ्याचे प्रश्नावर .दिनांक 22 डिसेंबर 2021 पासून मूबंई होणार्या हिवाळी अधिवेशनावर आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यातील आरोग्य उपकेंद्रात सेवारत महिला परीचर याना फक्त दिवसाला 100 रूपये रोज व महिन्याला 3000 रुपये.
आरोग्या सारख्या ठिकाणी पडेल ती कामं करायचे. कोविड 19 मधे लसीकरण पूर्ण दिवस कामं करायच. मग कोविड लसीकरण असो.. क किल्निक असो. रात्री बे रात्री डीलेवरी. असो. शस्त्रक्रिया शिबीर असो. नाईक डयूडी लावण्यात येते. परीसर स्वच्छता..साफ सफाई. शौचालय स्वचछ करण्या पासून कामं करावी लागतात. परंतू सरकार ह्या गरीब. निराधार .मागास. आदिवासी.समाजातील अत्यंत कनिष्ठ आणि उपेक्षित स्तरातून महिला परीचरांचया नेमणुकीच्या अशंकालीन कर्मचारी म्हणून आदेश देतात. प्रत्येक्ष सेवेत रूजू झाल्या वर सकाळी 8वाजता पासून सायं. 5 पर्यंत सूठी आणि सायंकाळ पर्यंत कामे करवून घेतले जाते. या आदिचा कूठलाही मोबदला दिल्या जात नाही. मानधन ही फक्त 3000 हजार रूपयेच देण्यात येतोय. त्याला किमान वेतना चा आधार नाही. म्हणून सातव्या वेतन आयोगा प्रमाणे किमान वेतन रूपये 18,000/- मिळणे आवश्यक आहे.
मा.आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब. यांनी फक्त हवेत गोळी बार करतात. दि.3 आगॅषट 2021 रोजीनिवेदन देऊन चर्चा करण्यात आली. व 27 आक्टोबंर 2021 रोजी फक्त आश्वासन दिले की मी दिवाळी नतंर मिटींग लावतोय आणि आपले प्रश्न सोडवतो असे भोगंळ आश्वासन दिले आहे. जर सवेदन शील मनाने हस्तक्षेप करून चर्चेची बैठक आयोजित करून सघंटने चे प्रश्न सोडविले असते तर. ह्या कोविड.
ओमायक्राॅन या परिस्थीतीत आदोंलन करण्याची वेळ आली नसती. आणि सघंटनेला हौस नाही आदोंलन करण्याची.
मागण्या..........
(1) नियमित सेवेत कायम करावे.
(2) गरजेवर आधारीत किमान 18000 हजार रूपये देण्यात यावे.
(3) कोविड लसीकरण भत्ता देण्यात यावे.
(4) अशंकालीन नांवात बदल करावे.
(5) दरवर्षी गणवेष व भाऊबिज देण्यात यावे.
(6) व्यती रिक्त कामाचा मोबदला देण्यात यावे.
ह्या मागण्या घेऊन दिनांक 22 डिसेंबर 2021 पासून मूबंई आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत.
राज्य अध्यक्षा मंगला मेश्राम नागपूर
राज्य सरचिटणीस मंजूळा बागंर अकोला.
राज्य कोषाध्यक्ष मा तूळसा काळे नागपूर.
राज्य कार्यधक्षा रूखमीनी पैठने परभणी.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघ 🙏
0 टिप्पण्या