अकोला एपीएलच्या सलामी सामन्यात जिदा वॉरियर्स
विजयी
अकोला-स्थानीय शास्त्री स्टेडियम मध्ये गुरुवार पासून अकोला एपीएल सीजन 2 क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे.या स्पर्धेत प्रथम दिनाच्या सलामीच्या सामन्यात गत वर्षीची विजेती चमू सुपर किंग व जिदा वरियर यामध्ये सामना खेळल्या गेला.यात जिदा वारियर्स ने सुपर किंग चा पराभव केला.जिदा वारियर्सचे आइकॉन क्लियर कप्तान जावेद अली यांनी प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय खरा ठरला.सुपर किंग ने 10 ओवर मध्ये 73 धाव काढून आपले सर्व गडी गमावले.सर्व बॉलर्स ने चांगले खेळीत आपल्या टीम ला सहकार्य केले.बॉलर सुल्तान जाधव ने सुपर किंगचे तीन महत्वपूर्ण खेळाडू बाद.या नंतर सुपर किंगच्या 73 धावांचे लक्ष्य जिदा ने केवळ 7 षटकात लिलया पूर्ण करीत या सलामीच्या सामन्यात एकतरफा विजय प्राप्त केला.सामन्यात उत्कृष्ट बॉलिंग साठी सुल्तान जाधव ला मैन ऑफ द मैच घोषित केले.जिदा वारियर्सचा पुढील सामना शनिवारी दुपारी 2 वाजता कॉटन सिटी रेंजर सोबत होणार आहे.जिदा वॉरियर्सच्या या विजयाबद्दल जिदाचे संचालक नोटरी, एड.इलियासी शेखानी,पत्रकार शाहिद इकबाल व समाजसेवी अब्दुल राजिक यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
0 टिप्पण्या