आमदार रणधीर सावरकर यांनी जाणून घेतल्या अकोट महामार्गावरील लोकांच्या समस्या
अकोला – अकोट महामार्गावरील बांधकामाधीन महामार्गावरील लोकांच्या समस्या अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी जाणून घेतल्या.
अकोला – अकोट हा महामार्ग अनेक दिवसांपासून रखडलेला असल्यामुळे ती वर्षांपेक्षा अधिक काळ कारचा झालेला आहे. पूर्वीच्या कंत्राटदाराच्या नाकर्तेपणामुळे व बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे पूर्वीच्या कंत्राटदाराकडून काम खून घेऊन नवीन कंत्राटदार नियुक्त केला असला तरी कामः बेग मात्र अपेक्षेप्रमाणे नसल्याने तसेच वाहुतुकीला होत असलेला खोळंबा आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराचे प्रतिनिधी यांच्या सोबत समस्याग्रस्त नागरिकांची बैठक घेऊन रस्त्याच्या बांधकामात सूचना देण्यात आल्या. या रस्त्यावरील सुकोडा फाट्या नजीक रखडलेल्या पुलाचे बांधकाम, प्रचंड खराब झालेला रस्ता, रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला खराब झालेला रस्ता, वल्लभनगर बस stop, गांधीग्राम बस stop या दरम्यान रस्ता मोठ्या प्रमाणात खंडित करण्यात येऊन रस्त्याला जी बाधा निर्माण झाली आहे ती तातडीने दुरुस्त करून रस्ता वाहतूक योग्य करण्यात यावा तसेच फाट्यानजीक प्रस्तावित उड्डाणपूलामुळे चौरस्त्यावरील व्यवसायिकांना तसेच वाहतूक प्रवाश्यांना बाधा येणार नाही या करीता रस्त्याच्या कामांमध्ये आवश्यकता दुरुस्त्या आमदार सावरकर यांनी सांगितल्या. या वेळी बाळासाहेब फोक्मारे, राजूभाऊ नागमते, विवेक भरणे, योगेश गायकवाड, पंकज फोक्मारे, मिलिंद गायकवाड, मधुभाऊ पाटकर, दत्तू पाटील गावंडे, महादेव कौलकार, अमोल गायकवाड, दिलीप गायकवाड, रोषण वानखडे, बाळकृष्ण फोक्मारे, दीपक वानखडे, स्क्शय वाघोडे तसेच बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता अद्चुले तसेच नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या