अकोला, वाशिम, बुलडाणा मतदार संघात भाजप, शिवसेना कडून उमेदवारी अर्ज दाखल
अकोला, दि.२२: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून,आज अकोला येथे भाजप आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यामुळे आता निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२१ साठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत दोघा उमेदवारांचे प्रत्येकी दोन असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत,असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी माहिती दिली आहे.
*अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे*
1) वसंत मदनलाल खंडेलवाल (भाजपा)- दोन अर्ज,
2) गोपीकिशन राधाकिसन बाजोरिया
(शिवसेना)- दोन अर्ज
कलम 144 चे झाले उल्लंघन, नियम व कायदे फक्त कागदोपत्रीच
जमावबंदीच्या कालावधीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चार किंवा चारपेक्षा जास्त व्यक्तीच्या जमावास प्रतीबंध राहील, असे आदेशात नमूद केले आहे. मात्र,आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच या आदेशाची उल्लंघन राजकिय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यां कडून होताना उपस्थित सामान्य नागरिकांना दिसली. शासनाचे आदेश, नियम, प्रतिबंध हे केवळ सामान्य नागरिकांसाठीच असतात का,असा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यलयात कामकाजासाठी आलेल्या सामान्य नागरिकांना पडला. काही नागरिकांनी याबाबत कुजबुज करीत नाराजी व्यक्त केली.
0 टिप्पण्या