Ticker

6/recent/ticker-posts

सोयरिक जुळवणारी व्यवस्था संपुष्टात —डाॅ.रणजित सपकाळ

सोयरिक जुळवणारी व्यवस्था संपुष्टात —डाॅ.रणजित सपकाळ —————————————————————



अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील सेवा समितीचा राज्यस्तरीय परिचय मेळावा १४नोव्हेंबरला                         
—————————————————————

अकोला —पूर्वीच्या काळी सोयरिक जुळवणारी व्यवस्था होती , हल्ली ती संपुष्टात आली आहे म्हणुन परिचय मेळावे घेणे कालसुसंगत असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॅ.रणजित सपकाळ यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळ कार्यालयात अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील सेवा समितीच्या  साप्ताहिक बैठकीत बोलत होते.पाटील सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार अध्यक्षस्थानी होते.     धावपळीच्या युगात सोयरिक संबध जुळवण्यासाठी सोईस्कर व्हावे म्हणुन दरवर्षी परिचय मेळावे घेतले जातात.येत्या १४ नोव्हेंबरला राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती डाॅ.रणजित सपकाळ यांनी  याप्रसंगी दिली.
 समाजाने अंधश्रद्धेला फाटा देत विवेकभान   जागृत ठेवुन कमीतकमी खर्चात लग्नसोहळे पार पाडण्याचे आवाहन महादेवराव भुईभार यांनी अध्यक्षीय भाषणातुन केले.   अकोला जिल्हा मराठा मंडळाचे सचिव प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले.पाटील सेवा समितीचे सचिव श्रीकृष्ण विखे यांनी परिचय मेळावा आयोजनामागील भूमिका विषद केली.सौ.सुधाताई अवचार यांनी आपली परिचय पत्रे मंडळाच्या अध्यक्षाकडे सादर केली.


श्री गुरुदेव सेवा मंडळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक आखरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन बबनराव कानकिरड यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.दत्तात्रय भाकरे यांनी केले.              
 सर्वश्री रमेश पाटील लोणाग्रेकर,गजानन डिवरे,केशवराव गावंडे,केशवराव मुरुमकार,दादाराव ठाकरे,सुधाताई अवचार,पंकज ठाकरे,महेंद्रकुमार अवचार ,देवेंद्र भाकरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या