महात्मा फुले समता परिषदेच्या अकोला महानगर महासचिव पदी अनिल मालगे यांची नियुक्ती
अकोला :- अकोला महानगर महात्मा फुले समता परिषदेच्या महानगर महासचिव पदी अनिल मालगे यांची नियुक्ती माजी आमदार तथा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस तुकारामभाऊ बिडकर यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेची महानगर जिल्हा कार्यालय अकोला येथे सभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस तुकारामभाऊ बिडकर हे होते, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष सदाशिवराव शेळके, महानगर अध्यक्ष प्रा.श्रीराम पालकर,महीला जिल्हाध्यक्षा सौ.मायाताई ईरतकर, , कार्याध्यक्ष उमेश मसने,आदी उपस्थित होते
अनिल मालगे यांच्या कार्याची दखल घेत प्रा तुकारामभाऊ बिरकड यांच्या सूचनेवरून महानगराध्यक्ष श्रीराम पालकर यांनी अनिल मालगे यांची नियुक्ती केली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्षा दीपमाला खाडे, महानगर कार्याध्यक्षा, कल्पना गवारगुरु, बार्शिटाकळी तालुका अध्यक्षा नेहा राऊत, महादेवराव साबे, सुभाष वाईनदेशकर, प्रा. अशोक भराड, राजमिलींद खाडे, चक्रधर राऊत, संजय तायडे आदी जिल्ह्यातील व महानगरातील महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळीसर्वांनी अनिल मालगे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या अशी माहिती गणेश भुजबुले यांनी दिली
---------------------------------------
0 टिप्पण्या