Ticker

6/recent/ticker-posts

भारत बंदला चांगला प्रतिसाद; अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा, नाना भाऊंनी स्वतः चालविला ऑटोरिक्षा*


*भारत बंदला चांगला प्रतिसाद; अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा, नाना भाऊंनी स्वतः चालविला ऑटोरिक्षा*


*नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा



दरम्यान, विदर्भातील अकोला येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नाना पटोले यांनी स्वतः मोटारसायकल चालविली. तसेच या मोर्चात आटोरिक्षा चालक मालक संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी ऑटोरिक्षा चालकांच्या समर्थनार्थ नाना पाटोले यांनी स्वतः ऑटोरिक्षा चालवून ऑटोरिक्षा चालक व मालक यांना पाठिंबा दिला. कोरोना लॉकडाउन काळात आटोरिक्षा चालकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे या बंद मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करीत मोर्चात सहभाग घेतला.


जगाचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यावर लाठ्याकाठ्या चालवणाऱ्या, त्याच्या हक्काच्या शेतात त्याला मजूर बनवून आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काळे कृषी कायदे लादणाऱ्या जुलमी-अत्याचारी मोदी सरकार विरोधात भारत बंद करण्यात येत असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. 
लढा भविष्यासाठी...शेतकऱ्यांच्या हक्कासाठी... अशी हाक पटोले यांनी यावेळी नागरिकांना दिली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या