*शहराचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद*
*महानच्या जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड*
अकोला-
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानच्या जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य पॅनलमध्ये स्पाकींग झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६.५० वाजता घडली. त्यामुळे शहराला होत असलेला पाणीपुरवठा विस्कळीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कामाला तातडीने सुरुवात झाली झाला असून पॅनलच्या दुरुस्ती नंतरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
येथील पॅनल दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. पॅनलमध्ये नेमका काय बिघाड झाला ही बाब तातडीने शोधण्यात येऊन दुरूस्ती करण्यात येईल. मागेदेखील अशाच प्रकारचे बिघाड झाली होते. तेव्हा ५० लाखाच्या जवळपास नव्याने पॅनल जोडले गेले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी अशा प्रकारची नादुरुस्ती झाली. पॅनल दुरुस्तीशिवाय अकोला शहराचा पाणीपुरवठा तुर्त अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. दुरुस्तीचे काम होताच अकोला शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा जलप्रदाय विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा होत असल्याचे जलप्रदाय विभागाकडून सांगितले जात आहे. वास्तविकतेत मात्र शहराच्या अनेक भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याची माहीती आहे. दोन दिवस आड़ पाणीपुरवठा केवळ कागदोपत्री असल्याने आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष देण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या