मोठी उमरी येथील राकाँ मित्र परिवारच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अकोला-- सामाजिक मानववसेवी सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या राष्ट्रवादी कांग्रेस मित्र परिवारच्या वतीने स्थानीय मोठी उमरी परिसरात लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राका सामाजिक न्याय विभागाचे महानगर उपाध्यक्ष अजय कांबळे व उप तालुका प्रमुख आकाश गुरव यांनी साकार केलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन व हारार्पणाने करण्यात आला.या नंतर सामूहिक अभिवादन करण्यात आले.यावेळी जेष्ठ समाजसेवी रेखा ओमप्रकाश मस्के काकू व गायत्रीताई ताथेड यांच्या हस्ते परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तके वितरित करण्यात आलेत.यावेळी अजय कांबळे यांनी राकॉ मित्र परिवाराच्या विविध उपक्रमांची माहिती देत अण्णाभाऊंच्या जीवनांचा माहितीपट सादर केला.
'जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव" हे त्यांचे ब्रीद त्यांच्या सामाजिक सेवा कार्याची सतत आठवण करून देते.समाजातील तमाम युवकांनी त्यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी असे आवाहन यावेळी केले.यावेळी कैलास कराळे,अंकुश राजनकर,अभी राजुरकर, लेकाश सिरसाठ,महेश राणे,गणेश,शरद मेनकार, अक्षय देशमुख, गौरव जावरकर,अमरदिप चौरपगार, गणेश ताजने,कार्तिक कटारे,अजय सोनोने,निशीकांत खांबलकर, मंगेश पारसकर,प्रफुल वाडेकर,सतीश जावरकर, रुषि उनाळे, प्रियल चौरपगार समवेत राकॉ मित्र परिवाराचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विध्यार्थी व नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या